आमवाताची कारणे
१)अग्निमांद्य (पचनशक्ती मंदावणे)
२)विरुद्ध गुणात्मक आहाराचे सेवन
३)अभिष्यंदी (दोषप्रकोपक) आहाराचे सेवन. उदा. दही, आंबवलेले पदार्थ इत्यादी
४)दीर्घकाळपर्यंत शिळ्या पदार्थांचे सेवन
५)अति उपवास करणे
६)मलमूत्रादी अधारणीय वेगांचे धारण करणे
७)रात्री अति प्रमाणात जागरण (रात्रपाळी करणा-या व्यक्ती)
८)वातदोषाचा प्रकोप करणारा आहार विहार
९)दिवसा झोपणे तसेच जेवल्यानंतर लगेच झोपणे.
१०)व्यायामाचा पूर्णत: अभाव
आमवाताची लक्षणे
१)संधिशूल (सांध्यांच्या ठिकाणी वेदना)
२)वेदनांचे स्वरूप विंचू चावल्याप्रमाणे असते.
३)सांध्यांच्या ठिकाणी सूज
४)सांध्यांच्या ठिकाणी उष्ण स्पर्श जाणवणे.
५)सांध्यांच्या ठिकाणी लालसरपणा.
६)सकाळच्यावेळी विशेषत: शीतऋतूत पर्वसंधी प्रदेशी वक्रता. (हातपायाची बोटे वाकणे)
७)संचारी शूल व संचारी वेदना हे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. अर्थात एकाच वेळेला विविध सांध्यांमध्ये वेदनांचा संचार होत असतो.
८)ज्वर प्रचिती (ताप जाणवणे)
९)सांध्यांच्या ठिकाणी क्रियाशूल, क्रियाकल्पता, क्रियाहीन होणे
वैद्य सुशांत पाटील
वसई
sushantayurved@gmail.com
https://www.facebook.com/vishwasanjivani/
#आयुर्वेद #आमवात
#rheumatology #reumatoid
#arthritis #RA #pain #jointpain